धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव शहरात कोरोनाचा पुन्हा कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताजळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार धरणगाव न पा व प्रशासनाने नवे निर्बंध जारी केले आहेत. धरणगाव नगरीची लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , मुख्याधिकारी जनार्धन पवार, नायब तहसिलदार प्रथमेश मोहड , सह्ययक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे, वैधकीय आधीक्षक डॉ गिरीश चौधरी, यांनी पत्रकारांशी बोलताना शहरात लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध लावण्यात येणार असे मत व्यक्त केले.
धरणगाव न पा व प्रशासनाने हे निर्बंध घालण्यात आले असून जळगांव जिल्हाधिकारी परिपत्रकाद्वारे ते जारी करण्यात आले आहे. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.
काय आहेत शहरात नवे निर्बंध?
जळगांव जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या नियमांनुसार धरणगाव शहरात सर्व हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
शॉपिंग मॉल्समध्ये देखील मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. मॉल व्यवस्थापनाने मॉलमधील आणि रेस्टॉरंट नियम पाळत आहेत याची चौकशी करण्यात येईल तसेच येणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवणे बंधनकारक राहील.
कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यास मनाई असेल. तसे झाल्यास ज्या जागी असे कार्यक्रम होतील, त्या जागेच्या मालकावर कारवाई केली जाईल.
लग्नकार्यामध्ये ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. अंत्यविधींसाठी २० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना देखरेख न पा प्रशानाची नजर असणार. होम आयसोलेशनमधील व्यक्तीच्या घराच्या दरवाजावर किंवा संबंधित जागेवर १४ दिवसांसाठी ही बाब स्पष्ट करणारा बोर्ड लावला जाणार आहे असे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , मुख्याधिकारी जनार्धन पवार नायब तहसिलदार प्रथमेश मोहड , सह्ययक पो नि गणेश आहिरे , वैधकीय अधीक्षक गिरीश चौधरी व प्रशासन मार्फत सांगण्यात आले यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी नगरसेवक व्यापारी भाजीपाला असोसिएशन पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते