धरणगाव येथे बसला अपघात; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

0

धरणगाव प्रतिनिधी । जळगावकडून धरणगावमार्गे अमळनेर जाणाऱ्या बस ओव्हेरटेक करतांना ब्रेक फेल झाल्याने इलेक्ट्रीक डीपीला धडक दिली. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

याबाबत माहिती अशी की, जळगाव-अमळनेर बस क्रमांक एमएच 14 बीटी 1330 धरणगाव मार्गे शहराजवळील कापूस जिनींग जवळून जात असतांना पुढील गाडीला ओव्हरटेक करतांना अचानकपणे ब्रेक फेल झाले. यात बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस थेटे रस्त्याला लागून असलेल्या ईलेक्ट्रीक डिपीला जोरदार धडक दिली. यात कोणतीही जिवीत हाणी अथवा दुखापत झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.