धरणगाव नगरपरिषदेत दिवाळीचा उत्साह ; कर्मचाऱ्यांना गणवेश, मिठाई व साडी वाटप
धरणगाव, — धरणगाव नगरपरिषदेतर्फे दिवाळी सणानिमित्त कर्मचारी वर्गासाठी आनंदमय कार्यक्रमाचे आयोजन नगरपरिषद कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश आणि मिठाईचे वाटप, तसेच महिला सफाई कामगारांना साडी भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर उपस्थित होते. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी फराळाचा कार्यक्रम घेतला आणि एकात्मता, स्नेह व सेवाभावाचा संदेश दिला.
कार्यक्रमादरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी विविध गाणी सादर करून कार्यक्रम अधिक रंगतदार केला. आनंद, उत्साह आणि परस्पर स्नेहाच्या वातावरणात संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
धरणगाव नगरपरिषद प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम दिवाळी सणाचे सामाजिक आणि कौटुंबिक मूल्य जपणारा ठरला.
याप्रसंगी कार्यालय अधीक्षक भिकन पारधी, कर प्रशासकीय अधिकारी मंगेश लंके, विद्युत अभियंता राहुल तळेले, पाणीपुरवठा अभियंता धनंजय कोठुळे, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, तुषार सोनार शहर प्रकल्प अधिकारी, निलेश वाणी शहर समन्वयक, विक्रांत चौधरी तांत्रिक सहाय्यक व किरण पाटील यांचेसह सर्व मुकादम कार्यालयीन कर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.