धरणगाव तालुक्यात नवीन ७ कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

धरणगाव (प्रतिनिधी) । तालुक्यात नवीन ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याचा अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. आढळून आलेल्या रुग्णांमध्ये चिंचपूरा १, आव्हानी २, तर धरणगावात ४ रुग्ण सापडले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

धरणगाव येथील कोविड केअर सेंटरने काही जणांचे स्वॅब सँपल पाठविले होते. यातील तब्बल तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज दुपारी स्पष्ट झाले आहे. यात आव्हानी २ तर धरणगाव शहरातील ४ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील मराठे गल्ली, साहिल नगर, घाटोळ अली आणि मोठा माळीवाडा परिसरातील रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्णांचा रहिवास असणार्‍या परिसराला सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भागात फवारणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत असली तरी संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.