तालुक्यातील६०००शेतकऱ्यांना मिळणार लाभ
धरणगाव(प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा अति वृष्टीने नुकसान झालेल्या कापूस पिकांचा पिक विमा मा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या भरीव प्रयत्नाने मंजूर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने शेतकरी वर्गाच्या तोंडावर हसू फुलले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत ना गुलाबराव पाटील जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ शिवसेना तालुका प्रमुख गजानन नाना पाटील शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्यासह विमा कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या तिनं वर्षा पूर्वी विमा कंपनीने भरलेल्या पैशातून कपात करुन पैसे दिले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा विमा कंपनीवरील विश्र्वास उडाला होता. मात्र, आता झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने अनेक शेतकरी पिकांचा विमा घेण्यासाठी पुढे येणार असल्याचे बोलले जात आहे. अखेर मात्र शेतकरी वर्गाला यश मिळाले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात अडचणी असतील आश्या शेतकऱ्यांनि शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ 9511655477, व शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन7020210134, कृषी अधिकारी अभिनव माळी 8275362427 याच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले.

