धरणगाव :– येथे ब्राम्हण समाजाचातर्फे विविध कार्यक्रमानी भगवान परशुराम यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आली. तत्पूर्वी धरणगाव नगरपालिकेतर्फे भगवान परशुराम यांचा प्रतिमेस पुष्पहार वृदावन आश्रम शाळा उ प येथील अनिल महाराज व समाजाचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी व विजयकुमार शुक्ला, गटनेते पप्पू भावे, कैलास माळी, भानुदास विसावे, पी एम पाटील सर, विजय महाजन, जितू धनगर, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, अवदेश बाचपाई, किरण अग्निहोत्री यांचा हस्ते पूजन करण्यात आले. तसेच संध्याकाळी 7-00वा शोभा यात्रेत विविध महापुरुष चा वेशभूषेत बालकलाकार नूत्य सादर करत तसेच भजनी मंडळनी शोभा यात्रेचे आकर्षण ठरले. शोभा यात्राचे पूजन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ गटनेते पप्पू भावे कैलास माळी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर भाजपा जिल्हा सरचिटणीस शिरीष बयस व समाज बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन अग्निहोत्री मॅडम यांनी केले तर आभार किरण अग्निहोत्री यांनी मानले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.