शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघांनी दिला पाठिंबा
धरणगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव येथे समस्त नाभिक समाजातर्फे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना निवेदन देण्यात आले.
या आहेत मागण्या
नाभिक समजला एस टी प्रवर्गात समविचारी करणे, संत सेना महाराज आर्थिक महामंडळ स्थापित करणे, प्रमुख ठिकाणी कॉम्प्लेक्स मध्ये सलून दुकाना साठी जागा आरक्षित ठेवणे, शिवा काशीद यांचा पन्हाळा गडावरील स्मारकासपर्यटन स्थळचा दर्जा देने,शिवरत्न जिवाजी महाले याचे प्रतापगड वर स्मारक उभारून पर्यटन स्थळ विकसित करण्यात यावे आशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
नाभिक समाज अध्यक्ष सतीश बोरसे, महेश निकम, अशोक झुझाराव, प्रश्नांत फुलपगार, विनोद झुझाराव, सुधाकर फुलपगार, राजेंद्र बोरसे, दिलिप गायकवाड, गोपाल वारुळे प्रवीण निकम, मोहन फुलपगार, आनंदा फुलपगार, विजय फुलपगार, चंद्रकांत फुलपगार, गोपाल फुलपगार, भरत परदेशी, हेमंत फुलपगार, सचिन ठाकरे, रामचंद्र कुवर सर्व समाज बांधव उपस्थित होते.