धरणगावात आगीत घर जळून खाक

0

धरणगाव । शहरातील पोलीस स्थानकाच्या समोर असणार्‍या घराला आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. याआगीत घर जळून खाक झालं आहे.  दरम्यान, परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून घरात असणार्‍या भिकूबाई सोनवणे या महिलेला लागलीच बाहेर काढले. यानंतर नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तथापि, आगीने भडका घेतल्याने या महिलेचे घर खाक झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.