धनाजी नाना महाविद्यालयाचे चार विद्यार्थी भारतीय सेनेत दाखल

0

फैजपूर : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे चार विद्यार्थी भारतीय सेनेत दाखल झालेत.  त्यापैकी तीन विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून परिसरातून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

धनाजी नाना महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता सोबतच विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजीत करीत असते. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककाच्या माध्यमातून कॅडेटना भरतीसाठी सैन्य प्रशिक्षण दिले जाते.  त्याचा परिपाक म्हणून तीन कडेट्सने भारतीय सेनेत मजल मारली. त्यात तायडे अमोल रवींद्र (सावदा), वाघ रितेश अनिल (मोठा वाघोदा), अडकमोल विशाल वसंत (वढोदा), पाटील दीपक राजेंद्र (कोचुर) यांची निवड झाली.  या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री शिरिषदादा मधुकर चौधरी आमदार रावेर विधानसभा, सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी, 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगांव चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशीलकुमार, सुभेदार मेजर अनिल कुमार, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, लेफ्टनंट डॉक्टर राजेंद्र राजपूत इतर प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.