धनाजी नाना महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

0

फैजपूर | प्रतिनिधी
धनाजी नाना महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. उदय जगताप हे अध्यक्ष स्थानी होते तसेच प्रमुख उपस्थिती जिमखाना समितीचे चेअरमन डॉ.सतिष चौधरी, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे, प्रा. आर.आर.राजपुत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. सौ. वंदना बोरोले व प्रा. दिलीप बोदडे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले तसेच प्रस्ताविक डॉ. सतिष चौधरी जिमखाना समिती चेअरमन यांनी केले आणि आभार प्रा. दिलीप बोदडे यांना मांडले.
कार्यक्रमाच्या उद्घटन प्रसंगी डॉ. उदय जगताप यांनी आधुनिक युगात खेळाला असलेले महत्व याविषयी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालय खेळाडूंना देत असलेल्या सोई सुविधांची माहिती खेळाडूंना दिली. यासोबतच महाविद्यालयातील क्रीडा विभागाची उल्लेखनीय कामगीरी आणि त्याबद्दल महाविद्यालयाच्या लौकीकात वाढ झालेली आहे. खासकरुन नॅक समितीने क्रीडा विभागाची प्रशंसा केली आहे असे त्यांनी सांगितले. याही पुढे खेळाडूने अजुन चांगली कामगीरी करावी त्यांच्या सोबत सदैव महाविद्यालय आणि संस्था राहिल असे सांगितले. प्रस्ताविकामध्ये डॉ. सतिष चौधरी यांनी मागिल 02 वर्षात क्रीडा विभागाने केलेली कामगीरी आणि महाविद्यालयाने खेळाडूंना दिलेल्या सोई सुविधा यासोबतच खेळाडूंना उपलब्ध असणा-या रोजगारांच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले. कनिष्ट महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.सौ. वंदना बोरोले मॅडम यांनी खेळातुन व्यक्तीमत्वाचा विकास आणि रोजगारांच्या संधी या विषयी मार्गदर्शन करतांना पालकांनी खेळाकडे पहतांना व्यवसायीक दृष्टीकोन ठेवावा असे अव्हान केले. वार्षिक क्रीडा स्नेह संम्मेलन स्पर्धेत विविध खेळांच्या वर्गांतर्गत स्पर्धा घेणार असल्याचे डॉ. गोविंद मारतळे यांनी सांगितले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयामार्फत विविध समित्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थी विरुद्ध विद्यार्थी, शिक्षक विरुद्ध शिक्षक, शिक्षक विरुद्ध शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विरुद्ध शिक्षक यांच्या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याची जबाबदारी या समित्यांवर सोपविण्यात आली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ.सतिष चौधरी,जिमखाना समिती चेअरमन, प्रा.आर.आर.राजपुत स्नेह सम्मैलन समिती चेअरमन, डॉ.जी.एस.मारतळे, प्रा.सौ.वंदना बोरोले, प्रा. शिवाजी मगर, प्रा. दिलीप बोदडे, श्री. आर.डी.ठाकुर, श्री. प्रकाश भिरुड, श्री. युवराज गाढे, श्री. शेखर महाजन, श्री. चेतन इंगळे, श्री. कैलाश मेढे, श्री. किरण नाथजोगी आणि विद्यार्थी व खेळाडू मित्र यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.