फैजपूर : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या स्वच्छता पखवाडा च्या औचित्याने आज दिनांक 14 डिसेंबर रोजी भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छ भारत अभियानात माझा सहभाग या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यात धनाजी नाना महाविद्यालया तील 14 व म्युनिसिपल हायस्कूल, फैजपुर येथील सहा एनसीसी कॅडेट्सनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या आयोजनासाठी अठरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर, धनाजी नाना महाविद्यालया चे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आर एल आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी लेफ्टनंट राजेंद्र राजपूत व चिफ ऑफिसर एस एम राजपूत यांनी कामकाज पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संजय बाऱ्हे, दुर्गेश महाजन, तोसिफ तडवी, महेश पाटील, तुषार मोरे, आशराज गाढे यांनी परिश्रम घेतले.