धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रकटले !

0

मुंबई: आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे कालपासून नॉट रिचेबल होते, त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला होता. मात्र आता धनंजय मुंडे देखील राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरला पोहोचले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मी बैठकीतून बाहेर आल्यानंतर बोलतो असे सांगून पुढे गेले. वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक होत आहे, त्यासाठी सर्व आमदार एकत्र आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.