धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण? वाचा सविस्तर

0

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर राजकीय वर्तुळासह राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, या सगळ्यामध्ये चर्चेचा केंद्र बिंदू आहे ती रेणू शर्मा.. .कोण आहे रेणू शर्मा ? हाच प्रश्न सध्या सर्वजण चर्चा करत आहेत.

रेणू अशोक शर्मा असे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू शर्मा यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडे आपले म्हणणे तक्रारीतून मांडले आहे.

शर्मा यांनी तक्रारीची प्रत ट्विटही केली आहे. रेणू शर्मा यांनी तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख १९९७ मध्ये झाली होती.

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची पहिली भेट मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये रेणू यांची बहीण करुणा शर्मा यांच्या घरी झाली होती. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय १६-१७ इतकं होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा १९९८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेल्या.

आपण (रेणू) घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होते. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी तक्रारीत केला आहे.

“धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता,” असेही रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.”धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता,” असंही रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनीही खुलासा केला आहे. “कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया आणि सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत.

सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (रेणु शर्मा करुणा शर्मा यांची सख्खी लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत,” असं सांगत धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.