धनंजय मुंडे यांची करोनावर यशस्वीपणे मात

0

मुंबई :– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दहा दिवसांपूर्वी मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनादेखील  करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत होते.  मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना करोनाची  लक्षणे  नाहीत. परंतु, १२ जून रोजी त्यांच्या करोना टेस्टचे अहवाल आले. धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

दरम्यान, याआधी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील करोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसेच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील करोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण करोनावर मात करुन घरी परतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.