धक्कादायक : 16 वर्षीय TikTok स्टारची आत्महत्या

0

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्यानंतर क्राईम पेट्रोल मालिकेची अभिनेत्री प्रिती मेहताच्या मृत्यूची बातमी आली. त्यानंतर मनोरंजन विश्वातील आणखी एका कलाकाराने आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान, काल 16 वर्षीय TikTok स्टार आणि डान्सर सिया कक्कडने आत्महत्या धक्कादायक घटना घडलीय.

सियाचे मॅनेजर अर्जुन सरीन यांनी तिच्या मृत्यूची माहिती दिली. सियाने नवी दिल्ली येथे आत्महत्या केली. “सियाच्या आत्महत्येमागे नक्कीच कुठलं वैयक्तिक कारण असावे, कारण ती काम चांगलं करत होती. मी सियाशी काल (24 जून) रात्रीच एका नवीन प्रोजेक्टबद्दल बोललो, तेव्हा ती सामान्य होती. ती खूप प्रतिभावंत होती”, अर्जुन सरीन यांनी सांगितलं.

सियाने आत्महत्या करण्याच्या 20 तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचा एका डान्स व्हिडीओ स्टोरी शेअर केली होती. गेल्या काही दिवसांपासून सिनेमा इंडस्ट्रीमधून सतत वाईट बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता इरफान खान, ऋषि कपूर, संगीतकार वाजिद खानचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. आता सिया कक्कडच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.