धक्कादायक : २ शिक्षकांचा सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

0

नांदेड :  बिलोलीतील शंकरनगरमध्ये सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर २ शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकांनी मुलीवर अत्याचार केल्यामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पिडीत मुलीवर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन शिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी कलम ३७६ आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकांनीच तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. पीडित विद्यार्थिनीला आरोपी शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडीओ दाखवतो, असं सांगून शाळेतील एका खोलीत घेऊन गेले. त्यानंतर मोबाईलवर एक अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. मुलीन घरी गेल्यानंतर घडलेला सगळा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. मुलीची प्रकृती नाजूक असल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित विद्यार्थिनीला आरोपी शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडीओ दाखवतो, असं सांगून शाळेतील एका खोलीत घेऊन गेले. त्यानंतर मोबाईलवर एक अश्लिल व्हिडीओ दाखवून तिच्यावर दोघांनी

सदर प्रकार समजताच पीडितेच्या आईने शिक्षकांविरोधात मुख्याध्यापकांकडे तक्रार नोंदविली होती. पण घटान समजल्यानंतरही मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई केली नाही. याउलट पीडित मुलगी आणि तिच्या आईवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकांनी बलात्काराच्या प्रकरणाची कुठेही वाच्यता करु नये म्हणून पीडित मुलीच्या आईकडून शपथपत्र लिहून घेतल्याची बाबही समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.