धक्कादायक – हाजी गफ्फार मलिक यांचे निधन

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मा. हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुख:द निधन झाले.

राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष, जळगाव शहरातील प्रमुख नेते हाजी गफ्फार मलीक ( वय 70) यांचे सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जळगाव जिल्हा आणि राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे चांगलेच वर्चस्व होते. आपल्या भाषणात विविध उदाहरणे आणि शेरोशायरीने ते अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. गफ्फार मलीक यांच्या जाण्याने जळगावची मोठी हानी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराने दि.२४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास निधन झाले.

मृत्यू समयी त्यांचे वय ७० होते.त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. हाजी गफ्फार मलिक यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांना जळगावातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

मात्र उपचाराआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. गफ्फार मलिक यांच्या निधनाची वार्ता पसरताच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

तत्कालीन जळगाव नपाचे ते सभापती होते. इकरा उर्दू एज्युकेशन सोसायटीचे सचिव, अँग्लो उर्दू हायस्कूलचे अध्यक्ष, मुस्लिम इदगाह कब्रस्थानचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी २०१४ मध्ये यावल-रावेर विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुली असा परिवार आहे.

परिचय–. हाजी गफ्फार मलिक खानदेशाचा लोकप्रिय चेहरा आहे. ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि जळगावच्या प्रतिष्ठित शिक्षण संस्था, अँग्लो उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची अनेक साखळी चालवित आहे. श्री.मालिक हे जळगावमधील एक प्रख्यात आणि लोकप्रिय नेते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ते महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर ते निवडणूक लढवली. अल्पसंख्याकांचा मोठा चेहरा म्हणून ते उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे जोरदार प्रतिनिधित्व करतात.

मलिक शहरातील ईदगाह कब्रस्तान चे अध्यक्ष , ईकरा शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव तथा शनिपेठचे माजी नगरसेवक होत.
गफ्फार मलिक यांच्या अचानक दुःखद निधन झाल्याने अल्पसंख्याक समुदायाच्या नेतृत्वा ची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.