धक्कादायक…! लॉकडाउनमुळे तरुणाने मंदिरात देवीसमोर कापली जीभ

0

नवी दिल्ली : करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याने एका तरुणाने आपली जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे. कामगार असणारा हा तरुण मूळचा मध्य प्रदेशातील आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याने तो गुजरातमध्ये अडकला आहे.  घरी जाण्यास मिळत नसल्याने त्याने मंदिरात देवीसमोर जीभ कापली. काही जणांनी त्याने देवीला दान करण्यासाठी जीभ कापल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

विवेक शर्मा असे या २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. विवेक शर्मा मूळचा मध्य प्रदेशातील मोरेने जिल्ह्याचा निवासी आहे. शिल्पकार म्हणून तो काम करतो. शनिवारी विवेक शर्मा मंदिरात बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. “त्याच्या हात कापलेली जीभ होती. आम्ही त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं,” अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एचडी परमार यांनी दिली आहे.

ज्या मंदिरामध्ये हा प्रकार घडला त्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे. तर विवेक शर्मा तेथून १४ किमी अंतरावर असणाऱ्या एका मंदिरात काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन जाहीर झाल्यापासून विवेक शर्मा प्रचंड अस्वस्थ होता. त्याला आपल्या कुटुंबीयांची आठवण येत होती. त्यामुळे घऱी जाण्यासाठी तो उत्सुक होता.

Leave A Reply

Your email address will not be published.