Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक.. लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक.. लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 13, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने पुण्यातील वानवडी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. त्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आल्या होत्या.

    याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू केला आहे. रश्मी आशुतोष मिश्रा (वय ४३) असं आत्महत्या करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचं नाव असून त्या देहरादून येथील रहिवासी आहेत. त्या पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी आल्या होत्या.

    मयत  रश्मी मिश्रा या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात आल्या होत्या. दरम्यान  या महिला लष्करी अधिकार्‍यानी गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून लष्करी प्रशासनातील अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

    मृत रश्मी मिश्रा यांनी कौटुंबीक कारणावरुन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित आत्महत्या लष्कराची संबंधित असल्याने या घटनेचा तपास वरिष्ठ पातळीवरुन सुरू करण्यात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    pune Sucide Case
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif