नागपूर :- नागपूरमध्ये एक 12 वर्षीय मुलगीने युट्यूबवर आत्महत्येचा एक व्हिडिओ पाहून गळफास घेण्याचा खेळ खेळायला गेली आणि जीव गमावून बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिखा विनोद राठोड असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता पाचवीत शिकत होती.
याबाबत अधिक असे की, शनिवारी दुपारी शिखाने वडिलांच्या मोबाइलमध्ये दोन मुली गळफास घेत असल्याची चित्रफीत पाहिली आणि आईलाही दाखविली. त्यानंतर आई शिवणकामात व्यस्त असतानाच तिने ती चित्रफीत लहान बहिणी सपना व निशाला दाखवली आणि सोबत व्हिडीओ बघून गळफास घेण्याचा खेळ खेळायला लागली. व्हिडिओनुसार ती स्टूलवर चढली, पंख्याला चामड्याचा पट्टा बांधला आणि तिने फास गळ्याला लावला पण दुर्दैवाने त्याचवेळी स्टूर सरकला आणि शिखाला गळफास लागला. त्यावर लहान बहिणीने आईला आवाज देवून बोलावलं, लटकलेल्या अवस्थेत तडफडणाऱ्या शिखाला घेऊन त्यांनी थेट रुग्णालय गाठलं, पण उपचारादरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास शिखाचा मृत्यू झाला.