धक्कादायक.. मामाने चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन भाचीवर केला अत्याचार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नराधम मामाने १६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर अत्याचार करणारी नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना जळगावत घडली असून याप्रकरणी  तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव  शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. पिडीत मुलगी ही मध्यप्रदेशातील रहिवाशी असून जळगावात नातेवाईकांसोबत मिळेल ते काम करते. तिचा मामाने  आठ दिवसांपुर्वी  नात्याने भाची असलेल्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केला.

तसेच कुणाला सांगितले तर तुला जीवे ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी संशयित आरोपीच्या विरोधात काल गुरूवारी २२ जुलै रोजी तक्रार दिली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला तालुका पोलीसात रात्री अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.