राजस्थान : मंदिर हे पवित्र स्थान आहे, त्यामुळे लोक येथे शिस्तबद्ध पद्धतीने वावरत असतात. मात्र याच पवित्र स्थानी एक किळसवाणा आणि धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील सरनेश्वर महादेव मंदिराच्या ओसरा पुजारीसोबत मंदिरात महिला उपस्थित असल्यानं त्या दोघांवर अनैतिक संबंधांचा आरोप करत नागरिकांनी मारहाण केली होती.
यासोबतच पुजाऱ्याला मारहाण करीत असताना मंदिरात उपस्थित असलेल्या महिलेचा व्हिडिओही बनवण्यात आला. तिला कपडे ओढून मारहाणही करण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुखावलेल्या महिलेने पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रसाद गोयल यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मंगळवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजर झाली.
यावेळी पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं की, पुजारी कुटुंब आणि त्याचे कुटुंब यांच्यात चांगले संबंध आहेत. त्यांनी पुजारीच्या पत्नीसह मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान पुजाऱ्याची पत्नी तेथे उपस्थित नव्हती. ती त्यांची वाट पाहत होती. दरम्यान, अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत काही लोकांनी त्यांना खोलीत बंद करून मारहाण केली. त्यांनी तिचे कपडे ओढून तिचा अपमान केला. या घटनेचा व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.
या सर्व प्रकारामुळे तिच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. ळी, पीडितेचे म्हणणे आहे की तिचा पती चांगल्या पदावर काम करतो. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. पीडितेने सुमारे 6 ते 7 जणांची नावे घेतली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात पीडितेने सांगितले की जर तिला न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयात बसून कारवाईची वाट पाहतील. पीडितेने तिच्या पतीसह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली केली.