धक्कादायक : भाजपा कार्यकर्त्यांची निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण

0

मुरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे भाजपा कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास सांगत होता, असा आरोप भाजपाने केला आहे.

देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. यावेळी मुरादाबादमधील बूथ क्रमांक २३१ येथे निवडणूक कर्मचाऱ्याला भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केली. निवडणूक कर्मचारी मतदारांना समाजवादी पक्षाच्या उमेदवारासमोरील सायकल चिन्ह असलेले बटण दाबायला सांगत होता, असा आरोप भाजपाने केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी हा प्रकार वरिष्ठ निवडणूक अधिकारी आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर पोलिसांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे


 

Leave A Reply

Your email address will not be published.