धक्कादायक : बोरीवलीत इडलीवाला चटणीसाठी वापरतोय टॉयलेटमधलं पाणी

0

बोरीवली :-सकाळच्यावेळी अनेकजण नाश्ता करण्यासाठी इडली आणि वडा हा पर्याय निवडतात. मात्र बोरीवली स्टेशनजवळच्या एका  इडलीवाल्याने लोकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. इडली,मेदूवडा विकणारा चक्क बोरीवली येथील टॉयलेटमधलं पाणी चटणीसाठी वापरतो आहे. या इडलीवाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंदर्भात त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने हे टॉयलेट नाही असे म्हटले आहे. मात्र व्हिडिओमध्ये तो टॉयलेटमधलं पाणी कॅनमध्ये आणून भरतो आणि तेच पाणी वापरतो हे स्पष्ट दिसते आहे.

दरम्यान या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली आहे. आम्ही या सगळ्या प्रकाराची चौकशी करतो आहोत हा इडलीवाला चटणी तयार करण्यासाठी टॉयलेटमधलं पाणी वापरत असल्याचं समोर आलं आहे. रस्त्यावर ठेला लावणारा हा इडलीवाला आणखी काय करतो? त्याच्याप्रमाणेच आणखी कोण कोण ठेलेवाले हे पाणी वापरत आहेत याची चौकशी आम्ही सुरू केली आहे असं अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी शैलेश आढाव यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.