पाचोरा : रुग्णालयातून काम आटोपून घरी परतत असलेल्या महिलेला रिक्षामध्ये टाकून शेतात तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना पाचोरा येथे घडली. महिलेने हा प्रकार शेजारच्या मंडळींना सांगितल्यानंतर हि घटना उघडकीस आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित महिला १९ रोजी संध्याकाळी रुग्णालयातून घरी परतत असताना पिंटू उर्फ गोविंद दत्तू पुजारी (३६, रा. हनुमान नगर, ता. पाचोरा) व त्याचा मित्र रिक्षा चालक नुरा फत्तू पटेल (५०, रा. शिवाजीनगर, पाचोरा) या दोघांनी तिला रिक्षामध्ये बसवून तारखेडा रस्त्यावरील एका शेतात नेले व तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान महिलेचे पती, सासू, सासरे बाहेर गावी गेलेले असल्याने रात्री महिलेने हा प्रकार शेजारच्या मंडळींना सांगितला. त्यावेळी पिंटू पुजारी याची धिंड काढत त्याला पोलीस ठाण्यात नेले. तेथे महिलेच्या फिर्यादीवरून आज शनिवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.