Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»धक्कादायक.. पाकिस्तानात श्रीलंकन मॅनेजरला भरचौकात जाळलं (व्हिडीओ)
    ताज्या बातम्या

    धक्कादायक.. पाकिस्तानात श्रीलंकन मॅनेजरला भरचौकात जाळलं (व्हिडीओ)

    Tushar BhambareBy Tushar BhambareDecember 4, 2021Updated:December 4, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाकिस्तानातून धक्कादायक बातमी समोर आलीय. एका समूहानं पाकिस्तानी मजुरांनी श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला भरचौकात जिवंत जाळलंय. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये हा धक्कादायक प्रकार काल दुपारी घडला. पाकिस्तानी क्रिकेट टीमचं साहित्य बनवणाऱ्या कारखान्यातील मजुरांनी हे अमानवीय कृत्य केलंय. याप्रकरणी 100 जणांना अटक केलीय.

    Horrific:A mob in #Sialkot killed a sports factory manager (of #SriLankan origin) for allegedly removing #TLP posters. The #videos of his lynching/burning are brutal reminders of state policies that have radicalized generations,normalizing murders & mainstreaming radical groups. pic.twitter.com/R112mp0CNf

    — Raza Ahmad Rumi (@Razarumi) December 3, 2021

    जमावाच्या या मारहाणीत मृत्यू झालेल्या श्रीलंकन व्यक्तीचं प्रियांथा कुमारा असं नाव असून प्रियांथा यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेलं धार्मिक पोस्टर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. त्यामुळं फॅक्टरीतील मजुरांसह भडकलेल्या जमावानं हे संतापजनक कृत्य केल्याचं समोर आलंय.  श्रीलंकन ​​नागरिकाला मारलेल्यांची ओळख पटवण्यासाठी आणि अटक करण्यासाठी पोलिसांनी दहा टीम तयार केल्या आहेत.

    पंजाब सरकारचे प्रवक्ते हसन खरवार यांनी पत्रकारांना सांगितलं की, मॉब लिंचिंग प्रकरणात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आलीय.  सीसीटीव्ही फुटेजवरून काहींची ओळख पटली असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान  यांनीही या कृत्याचा निषेध व्यक्त केलाय. त्यांनी म्हटलं की, हा देशासाठी लाजिरवाणा दिवस ​​आहे आणि यात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितलंय.

    दरम्यान, श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय, तर अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं स्वतंत्र तपासाचा आग्रह धरलाय. ही घटना वजिराबाद रोड परिसरात घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष पाहायला मिळतोय.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif