धक्कादायक ! नाडगाव येथे शिक्षकाची शिक्षिकेवर चाकू हल्ला

0

बोडवड :- तालुक्यातील नाडगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाने शिक्षिकेवर चाकूने हल्ला करीत स्वत:वरदेखील वार करून घेतल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली. दरम्यान, जखमी अवस्थेत दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक कपूरचंद एकनाथ पाटील यांनी संस्थेतीलच शिक्षिका चंदा घरकर यांच्यावर आज १०.३० वाजेच्या सुमारास चाकू हल्ला केला. त्यानंतर पाटील यांनी स्वत:वरदेखील वार करून घेतले. यात दोघेही जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.