मुक्ताईनगर :- शाळेचे पुस्तके मिळाले नाही म्हणून येथील नववीत शिकणाऱ्या मुलीने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. दरम्यान मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मुक्ताईनगर शहरातील संभाजीनगरमधील एक मुलगी नववीत शिकते. तिने वडिलांकडे पुस्तके मागितली होती. परंतू पुस्तकं वेळेत न मिळाल्याने तिने संतापाच्या भरात घरात कुणीही नसताना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या आजोबांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने खाली उतरवले. परिस्थिती गंभीर असल्यामुळे विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसात कुठलीही नोंद नसल्याचे कळते.