धक्कादायक.. नर्सवर डॉक्टरकडून बलात्कार; गोळ्या देवून गर्भपात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगाबाद

गारखेडा येथील एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरने संबंधित रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सवर बळजबरीने बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडित तरुणीला फ्लॅटवर आणि हॉटेलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली असता, आरोपीनं गर्भपाताच्या गोळ्या देऊन विनासंमती तिचा गर्भपात केला आहे.

एवढंच नव्हे तर आरोपी डॉक्टरच्या अन्य तीन मित्रांनी देखील विनयभंग केला असल्याचा आरोपी पीडित तरुणीने केला आहे. दामिनी पथकाच्या मदतीने अखेर पीडित तरुणीने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसाद संजय देशमुख (वय २५) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. यासोबतच हॉटेलचा मालक आणि आरोपीचा मावस भाऊ दीपक पाटील आणि मेडिकल चालक सचिन शिंदे यांच्यासह आणखी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद देशमुख हा गारखेडा परिसरातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये आरएमओ डॉक्टर म्हणून काम करतो.

तर पीडित तरुणी देखील याच रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करते. आरोपी देशमुख याने नोव्हेंबर 2021 मध्ये पीडित तरुणीशी मैत्री केली होती. यानंतर त्याने पडेगाव येथील फ्लॅटवर आणि अन्य ठिकाणी घेऊन जात पीडितेवर बलात्कार केला आहे. यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली असता, आरोपीनं गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला आहे.

दरम्यान पीडित नर्सला वेदना सहन न झाल्याने ती डॉक्टरकडे गेली. यावेळी आरोपी डॉक्टरने पीडितेला मुकुंदवाडी येथील आपल्या नातेवाईकाच्या हॉटेलवर घेऊन जात, तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर तिला तिथेच सोडून आरोपी निघून गेला. यावेळी हॉटेलचा मालक आणि आरोपीचा मावसभाऊ दीपक पाटील यानेही पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

आरोपीच्या तावडीतून पीडित तरुणी कशीबशी सुटून बाहेर येताच, सचिन शिंदे आणि त्याच्या अन्य एका मित्राने पीडितेशी अश्लील वर्तन केलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणी अवघडलेल्या अवस्थेत सिडको बस स्थानक परिसरात गेली. हा सर्व प्रकार जवळच असणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाने पाहिला आणि त्यांनी दामिनी पथकाला याची माहिती दिली. दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेत, पीडितेला धीर दिला. यानंतर दामिनी पथकाने पीडित तरुणीला मुकुंदनगर पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.