धक्कादायक : तब्बल १० हजार महिलांशी संबंध ; या प्रसिद्ध फुटबॉलपटूने केला दावा

0

पॅरिस ;- वादग्रस्त फ़ुटबाँल पटू बेंजामिन मेंडीवर बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न असा दुहेरी खटला सुरु आहे. बेंजामिन मेंडी हा प्रसिद्ध फुटबॉलपटू असून तो मॅनटेस्टर सिटीकडून ) खेळतो. एका मीडिया रिपोर्टनुसार तब्बल 10 हजार महिलांबरोबर सेक्स केल्याचा दावा बेंजामिन मेंडीने केला आहे. बेंजामिन मेंडवर 2020 मध्ये मोट्रम सेंट एंड्रयू, चेशायरमध्ये एका 24 वर्षीय तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर एका तरुणीवर बलात्कार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

2018 मध्ये विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा तो खेळाडू आहे. बेंजामिन मॅचेंस्टर सिटीसाठी तब्बल 75 सामने खेळला आहे. त्याआधी मेंडी अंडर-16, अंडर-17 संघाकडून खेळला आहे. अंडर-17 संघातून खेळताना फ्रान्सने विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली होती.

26 ऑगस्ट 2021 मध्ये मेंडीवर बलात्काराचे चार आणि लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आला. 2020 ते 2021 या काळात 16 वर्षाखालील तीन अल्पवयीन मुलींनी त्याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार केली. या आरोपांचा इन्कार करत त्याने जामीनासाठी अर्ज केला, पण तो फेटाळण्यात आला. यानंतर मॅंचेस्टर सिटीने क्लबने त्याचं निलंबन केलं. 2022 मध्ये त्याला काही अटीशर्तींवर जामीन देण्यात आला. त्याला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला.

मेंडीवर एकूण आठ बलात्काराचे आरोप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.