धक्कादायक : डोंबिवलीच्या रुग्णालयातून क्वॉरंटाइन रुग्ण पळाला ; पोलिसांकडून शोध सुरु

0

ठाणे: डोंबिवलीतील एका रुग्णालयातून एक क्वॉरंटाइन रुग्ण शनिवारी रात्री रुग्णालयातून पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.करोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानं या व्यक्तीला क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. आता हा रुग्णच पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातही करोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून काही संशयितांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णालयात क्वॉरंटाइन असलेला एक रुग्ण शनिवारी रात्री रुग्णालयातून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्यानेही हा रुग्ण पळून गेल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.