जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहातील एक ४० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील गणेश कॉलनी येथील आशादीप वसतीगृहात ४० वर्षीय महिला दाखल होती. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३वाजेच्या सुमारास ही महिला कोणाला काहीही न सांगता आशादीप वसतीगृहातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने आशादीप वसतीगृहातील केअर टेकर सुनंदा नंदकिशोर पोतदार यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी हे तपास करीत आहेत. रंग गोरा, शरीराने सडपातळ, उंची पाच फुट, पाच इंच, अंगात पोपटी रंगाचे ब्लाऊज, टिकल्याची साडी, हातभर बांगड्या, हनुवटीवर गोंदलेले, नाक सरळ असे महिलेचे वर्णन असून महिला कुणाला आढळून आल्यास संबंधितांनी जिल्हापेठ पोलिसांची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.