धक्कादायक : जन्मदात्या आईकडून मुलीची हत्या

0

बारामती : येथील प्रगतीनगर भागात प्रेमप्रकरणाच्या रागातून जन्मदात्या आईनेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालुन खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  मुख्य म्हणजे मुलीची हत्या केल्याचं स्वत: आईनेच पोलिसांत सांगत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ऋतुजा हरीदास बोभाटे (वय १९) असे खुन झालेल्या मुलीचे नाव आहे. तर संजीवनी हरीदास बोभाटे असे हत्या करणाऱ्या आईचे नाव आहे.

ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, मुलगा तिला नांदवायला नेत नव्हता.  यावरुन घरी झालेल्या वादात रागाच्या भरात आईने मुलीच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन केला आहे. मंगळवारी सकाळी हि घटना प्रगतीनगर परीसरातील मुलीच्या घरात घडली.  मुलीच्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होता. लग्नानंतर ऋतुजाचा पती नांदविण्यास नेत नव्हता. याप्रकरणी ऋतुजाच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आई वडीलांनी मुलीला नांदविण्यास नेण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळीबरोबर चर्चेचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. हत्येच्या दिवशी देखील मुलीत आणि आईत भांडण झाले. अखेर संतापलेल्या आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. इतकेच नाही तर, या प्रकारानंतर आई संजीवनी हरीदास बोभाटे हीने स्‍वत:हून बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होत, स्वतः केलेल्‍या कृत्‍याची पोलिसांसमोर कबुली दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.