धक्कादायक : गोंदियात मोदींच्या सभेसाठी पैसे देऊन जमवली गर्दी

0

नागपूर :– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेरठ आणि वर्धा येथील सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्यानंतर बुधवारी गोंदियात मोदींच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमा करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. १०० रुपयांपासून ते प्रति गाडी ५०० रुपयांपर्यंत पैसे देण्यात आल्याचे सभेसाठी आलेल्या लोकांनी मान्य केले.

मेरठ आणि वर्धा सभेकडे लोकांनी पाठ फिरविल्यानंतर गोंदियातील सभेत भाजपाने गर्दी जमवण्याकडे विशेष लक्ष दिले होते. त्यानुसार सिग्नल टोळी या गावातील काही महिलांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया दिली आहे. १५० रुपये मिळाल्याचे या महिलांनी मान्य केले.अनेकांनी खासगीत बोलताना पैसे मिळाल्याचे मान्य केले. काहींनी ‘आता एका गाडीमागे ५०० रुपये मिळाले. हे पैसे नाश्ता आणि पाण्यासाठी देण्यात आले. उर्वरित पैसे नंतर मिळतील”, असे सांगितले. पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला, असे लोकसत्ता ऑनलाईनच्या पाहणीतून समोर आले आहे.


 

Leave A Reply

Your email address will not be published.