धक्कादायक ! कोविड रुग्णालयाला आग; 8 रुग्णांचा होरपळून मृत्यू

1

अहमदाबाद : कोरोनाचं संकट असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड सेंटरला भीषण आग लागली. या आगीत होरपळून ICU मधील 8 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात मोठी खळबळ उडाली. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.


मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद इथे नवरंपुऱ्यातील कोविड डेडिकेटेड श्रेय रुग्णालयात पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात आलं आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आगीचं कारण आद्याप स्पष्ट झालेलं  नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

1 Comment
  1. Subhash B Ajnadkar says

    Latest and updated news and information is truly appreciated

Leave A Reply

Your email address will not be published.