धक्कादायक : आरपीएफ कॉन्स्टेबलचा टॅक्सीचालकावर बलात्कार

0

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलने चक्क टॅक्सीचालकावर जबरदस्ती करत, अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  धक्कादायक म्हणजे वेश्या वस्तीत टॅक्सी नेण्यास विरोध केल्याने, कॉन्स्टेबलने थेट टॅक्सीचालकावरच अनैसर्गिक कृत्य केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्टेबल अमित धनकवडे याला अटक केली आहे.

आरोपी कॉन्टेबल हा शनिवारी रात्री पीडित चालकाच्या टॅक्सीत बसला होता. त्यावेळी कॉन्स्टेबलने टॅक्सी ग्रॅण्ट रोड इथल्या वेश्या वस्तीत नेण्यास बजावलं. मात्र टॅक्सी तिकडे नेण्यास चालकाने नकार दिला. त्यावेळी कॉन्स्टेबलने थेट चालकाला मारहाण करुन त्याच्यासोबतच अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पीडित टॅक्सी चालकाने पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here