धक्कादायक ! अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

0

बुलढाणा : अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात घडली. उमेश सिरसाट असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावरुन एक विना नंबरचा टिप्पर रेती घेऊन खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती जलंब पोलीस ठाण्याचे स्टेशनचे पोलीस उमेश सिरसाट यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत एका होमगार्डला घेऊन दुचाकीनं त्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टीप्पर च पाठलाग करत असलेल्या उमेश शिरसाट यांनी काही अंतरावर या गाडीच्या पुढे जाऊन आपली दुचाकी टिप्पर पुढे आडवी करून उभी केली. दरम्यान, यानंतर टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं आपलं वाहन त्यांच्या अंगावरून नेलं.यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.