अमळनेर | प्रतिनिधी
येथील रुग्णालयात आलेल्या माळी वाड्यातील महिलेचा विनयभंग केल्याची घटना ६ रोजी रात्री १०.30 वाजेच्या सुमारास घडली आली आहे. माळी वाड्यातील २८ वर्षीय महिला आपल्या मुलाला कुंटे रोड येथील हितांश हॉस्पिटलला घेवून आली हाेती. या वेळी डॉ. सचिन काटे यांनी तपासणी केल्यानंतर ही महिला ओट्यावर बसली हाेती. या वेळी माळी वाड्यातील देविदास आत्माराम महाजन हा व्यक्ती आला आणि त्या महिलेचा हात धरून त्याने विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून देविदास महाजन यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल आलोक साबळे करत आहेत.