द पल्सेस कॉन्क्लेव्ह परिषदेचे आयोजन

0

जळगाव – २९ जानेवारी २०२०: भारतातील डाळींचा व्यापार व त्यासंबंधित उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्था असलेल्या इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने (आयपीजीए) आपली ‘द पल्सेस कॉन्क्लेव्ह’ ही दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी परिषद यावर्षी १२ ते १४ फेब्रुवारी २०२० दरम्यान महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळच्या अॅम्बीर व्हॅली सिटीत आयोजित केली असल्याचे जाहीर केले. या परिषदेचे यंदा पाचवे वर्ष आहे.

भारताबरोबरच डाळींची निर्यात करणाऱ्या अमेरिका,ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, इथिओपिया, युगांडा, टांझानिया, मोझांबिक, मालावी यांसारख्या महत्त्वाच्या देशांतील या क्षेत्रात काम करणाऱ्या १००० व्यक्ती, व्यापारी द पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२० मध्ये सहभागी होतील अशी आयपीजीएला अपेक्षा आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार व अन्न पुरवठा विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या द पल्सेस कॉन्क्लेव्ह परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कॅनडातील सास्कात्चेवान सरकारचे कृषिमंत्री डेव्हिड मारिट या परिषदेला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमणियन, राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे सीईओ डॉ. अशोक दलवाई, माजी कृषी सचिव आणि एफएसएसएआय चे माजी अध्यक्ष आशिष बहुगुणा, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार डॉ. बिजय बेहरा, केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे कृषी आयुक्त डॉ. एस के मल्होत्रा हे मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.द पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२०च्या अजेंड्याचा भाग म्हणून देशांतर्गत डाळींच्या उत्पादनात वाढ करणे व त्यांच्याप सेवनाचे प्रमाण वाढवणे या विषयावर या परिषदेत चर्चा होणार आहेच, पण ती केवळ त्या विषयांपुरती मर्यादित न राहता अन्न प्रक्रिया क्षमता वाढवणे, सेवनाचे प्रमाण वाढवणे, निर्यात, मूल्यवर्धन, प्रोटिन विलगीकरण, सुगीनंतरचे पीक नियमन इ. या विषयांवरही परिषदेत चर्चा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.