Wednesday, May 18, 2022

दोन रिक्षांचे चाके लंपास करणाऱ्या दोघांना अटक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   

- Advertisement -

जळगाव  शहरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर उभ्या दोन रिक्षाचे लोखंडी डिक्ससह चाके लांबवल्याची घटना सोमवारी ६ सप्टेंबर रोजी समोर आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

- Advertisement -

जोशी कॉलनी येथील प्रेम शरद बागुल यांनी रविवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता या रिक्षा चालकाची (एमएच १९ सीडब्लु ३११५) या क्रमांकाची रिक्षा घरापासून काही अंतरावर असलेल्या कला भवनसमोर उभे केली होती. काल सोमवारी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन जाण्यासाठी बागुल घराबाहेर पडल्या असता त्यांना रिक्षाचे मागील चाक लोखंडी डिस्कसह चोरट्यांनी लांबविले असल्याचे दिसून आले.

याच दरम्यान बागुल यांच्या रिक्षा उभ्या असलेल्या दुसऱ्या (एमएच १९ जे ७७८१) या क्रमांकाच्या रिक्षाचेही मागील बाजूचे चाक लोखंडे ट्रकसह चोरून नेल्याचे समोर आले. अशाप्रकारे दोन रिक्षांचे चार हजार रुपये किंमतीचे चाके लांबवल्याप्रकरणी प्रेम बागुल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोहेकॉ जयंत चौधरी, पोहेकॉ सुनिल दामोदरे, दिपक पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील यांनी रिक्षाचे चाक चोरीतील संशयित आरोपी कंरजवाड्यात मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता संशयित आरोपी आकाश अरूण जोशी (वय २४,  रा. सिंगापूर कंजरवाड० आणि राहूल गणेश महाजन (वय १९,  रा. टिपू सुलतान नगर तांबापूरा) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे रिक्षाचे चाके हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या