Wednesday, May 18, 2022

दोन मुली एकमेकींच्या प्रेमात; पळून जाऊन केलं लग्न

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

 

- Advertisement -

नवी दिल्ली – प्रेमाचे वेगवेगळे किस्से आपण ऐकतच असतो. कोण कधी कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत. घरातून पळून जाऊन त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. एका तरुणीचा बहिणीच्या नणंदेवरच जीव जडला आणि त्यांनी एकत्र राहण्यासाठी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. एक 22 वर्षीय तरुणी साधारण एक वर्षापूर्वी आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी आली. येथे तिची बहिणीच्या नणंदेशी भेट झाली. या दोघींच्या भेटीगाठी चांगल्याच वाढू लागल्या आणि जवळीक इतकी वाढली की दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्या.

राजस्थानच्या चुरूमध्ये ही घटना घडली आहे. एकमेकींच्या प्रेमात पडल्याने रतनगडमधील 18 वर्षीय तरुणी रात्री घराबाहेर पडली आणि हरियाणातील आदमपूर मंडी येथील 22 वर्षीय तरुणीसोबत फतेहाबादमध्ये जाऊन दोघींनी लग्न केलं. या अनोख्या लग्नाची आता चांगली चर्चा होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली एकमेकींवर प्रेम करतात आणि त्यांना एकत्र राहायचे आहे. दोघींना खूप समजावले पण पटले नाही. एएसआयने मुलींकडे हरियाणात लिव्ह-इन रिलेशनशिपची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यांच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे नाहीत असं म्हटलं आहे.

रतनगड येथील रहिवासी मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मी माझ्या मुलीला खूप समजावलं. पण तरीही ती ऐकत नाही, तिला आम्ही सांगितलेलं पटत नाही. माझी मुलगी तशी अजिबात नव्हती. कुठल्या ना कुठल्या दबावात किंवा काहीतरी जादूटोणा झाल्याने ती तिच्यासोबत गेली असावी. तीन भावंडांमध्ये ती सर्वात लहान आहे. भाऊ मजुरीचे काम करतो तर दुसरा अपंग आहे. मुलगी सातवीपर्यंत शिकली आहे. मुलीनं हे चुकीचं केलं आहे, पण आता मी तिला कसं समजावू? ती काही समजून घ्यायला तयार नाही असं म्हटलं आहे.

वडिलांनी सांगितले की, ती फक्त एकच हट्ट धरून बसलेय की, त्या मुलीसोबत हरियाणाला जाणार. मुलीचे वडील सध्या शेती करतात. दुसरीकडे हरियाणातील रहिवासी असलेल्या मुलीला चार भावंडे आहेत ज्यात ती स्वतः सर्वात मोठी आहे. तिच्या एका बहिणीचे लग्न माझ्या पुतण्याशी झाले आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर मुलगी दोन महिने हरियाणातील एका तरुणीसोबत राहत होती. 10 जानेवारीला संध्याकाळी आम्ही पोलिसांसोबत कार भाड्याने घेऊन हरियाणातील आदमपूरला गेलो. रात्रभर तिथेच थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आदमपूर पोलीस ठाण्यात गेले. तेथील पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला.

पोलिसांना दिलेल्या माहितीत, रतनगडमधील 18 वर्षीय तरुणीने सांगितले की, तिला तिचे आयुष्य मुक्तपणे जगायचे आहे. याशिवाय हरियाणातील 22 वर्षीय तरुणीने सांगितले की, आम्ही दोघी एकमेकींवर प्रेम करतोय आणि भविष्यात आम्हाला एकत्र आयुष्य घालवायचे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्यांना बराच वेळ समजावून सांगितल्यानंतरही त्या दोघी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. सध्या ही बाब जिल्ह्यात चांगलीच चर्चेत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या