दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल चिमुरड्याना घरी सोडून बजावित आहेत कर्तव्य

0

जामनेर (प्रतिनिधी): – येथील पोलीस स्टेशनच्या स्वपना देशमुख व सविता राठोड ह्या दोन कर्तव्य दक्ष महिला पोलिस कॉन्स्टेबल आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याना घरी सोडून कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या पार्श्र्वभूमीवर डॉक्टारां सारख्या देवदूतांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावित आहेत.

एकीकडे संपूर्ण देशात कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या आजाराने रोजच् महाराष्ट्रासह देशात नवनवीन पेशंट ची भर पडत असतना सरकार आपल्या परीने जनतेला सहकार्य करत असताना जनतेला विनाकारण घराच्या बाहेर पडू नका म्हणून सांगत आहे.तर जनता मात्र प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाही. दुसरीकडे मात्र पोलीस सेवेत असलेल्या ह्या रणरागिणी आपल्या जीवाची व आपल्या परिवाराची पर्वा नकरता जनतेच्या सेवेसाठी आहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहे.त्यात त्यांना दोन वर्षाच्या बाळाच्या दातृत्वाचा सुध्दा विसर पडलेला दिसून येत आहे. आपल्या चिमुकल्याला एकदाचे घरी सोडून ड्युटी वर आल्यानंतर त्या रणरागिणी आपल्या साठी रखरखत्या उन्हात उभ्या राहून व कधी पायपीट  करून जनतेला कधी प्रेमाने सांगून कधी काठीचा प्रसाद देऊन कोरोना च्या पार्श्र्वभूमीवर आपल्या घरीच थांबून राहण्याचे आवाहन करीत आहेत. आशा ह्या महान रणरागिणीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.