दोन महिन्यांपासून फरार दुचाकी चोरट्याला अटक

0

जळगाव: दुचाकी चोरी केल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आकाश संजय नागपुरे (१९, रा. शिरसोली ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील जळके येथील किरण हिलाल चिमणकारे यांच्या दुचाकीची २४ जूनला चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरसोली येथील आकाश नागपुरेने दुचाकी चोरल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोधपथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोउनि दीपक जगदाळे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांचे पथक तयार करत कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने मंगळवारी गावातून आकाशच्या मुसक्या आवळल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.