दोन तालुकाध्यक्षांच्या वादात कॉग्रेस कमीटी कार्यालय अनेक दिवसांपासून बंदच

0

जळगांव –
येथील जळगांव तालुका काँग्रेस कमीटीचे कार्यालय दोन तालुकाध्यक्ष यांच्या वादामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांना बैठक वा पक्षासंदर्भात निर्णय मार्गदर्शन अन्यत्र ठिकाणी घ्यावे लागत असल्याची स्थिती आहे. तालुकाध्यक्ष संजय वराडेंना काँग्रेस प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांच्या गेल्या सहा महिन्यांपुर्वी नोटीसीव्दारे पदावरून काढण्यात आले असून त्यांच्या जागी मनोज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती कॉग्रेस कार्यालयातुन देण्यात आली.
कॉग्रेस तालुकाध्यक्ष संजय वराडे यांच्या विषयी अनेक तक्रारी होत्या. त्यानुसार प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी वराडे यांना सहा महिन्यांपूर्वी पदावरून दूर करण्यात येत असल्याचे नोटीसीत म्हटले होते. त्यांच्या जागी मनोज चौधरी यांना जळगांव तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले असून तत्कालीन तालुकाध्यक्ष वराडे यांनी कार्यालयाची चाबी अद्यापपावेतो दिलेली नाही. लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीसंदर्भात काँग्रेसअनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कॉग्रेस पक्षात अंतर्गतच अनेक कलह असून पदाधिकारी विविध कारणावरून आंदोलन केल्याने जिल्ह्याभरात कॉग्रेस कार्यकत्यार्ंत संभ्रम आहे. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदिप पाटील यांच्याविरूद्ध महिला शहराध्यक्षा यांनीच कारवाई करण्यात यावी अशी मागणी करून कार्यालयाचा खर्च देखिल इतर दुकांनांना दिलेल्या भाडयामधूनच करण्यात येतो यामुळे भिक मागो आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे महिला शहराध्यक्षा यांना पदापासून बरखास्त करण्याचा ठराव काही दिवसांपूर्वी एक मताने करण्यात येवून कॉग्रेस महाराष्ट्र प्रभारी खा. अशोक चव्हाण यांचेकडे पाठविण्यात आला होता.
-तालुका काँग्रेस कार्यालयाची चाबी संदर्भात प्रतिक्रीया घेण्यासंदर्भात संपर्क केला असता त्यांनी आमचा व्यक्तीगत प्रश्न असून काहीहि माहिती देण्यास टाळाटाळ केली.
तालुकाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली असली तरी कार्यालयाची चाबी मिळालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.