भुसावळ दोन्ही मुलांना रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो यासाठी वेळोवेळी पैसे घेऊन सुमारे नऊ लाख 65 हजार रुपयांची फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील स्वामी समर्थ मंदिरा मागे भुसार आळी येथे राहणारे विश्वास वालवडकर वय 69 हे सेवानिवृत्त व्यक्ती असून त्यांची दोन मुले वेंकटेश वालवडकर आणि प्रसाद वालवडकर यांना रेल्वे मध्ये नोकरी लावून देण्याचे अमिष संशयित आरोपी प्रकाश हरिश्चंद्र सोनवणे रा.सोमेश्वर नगर शांतीनगर भुसावळ यांनी दिले होते. त्यानुसार
जुलै 2019 ते जून 2023 पर्यंत वेळोवेळी नऊ लाख 65 हजार रुपये घेतले. तसेच बनावट कागदपत्रे देऊन त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विश्वास वालवडकर यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला प्रकाश सोनवणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौधरी करीत आहे.