चिनावल (वार्ताहर) : चिनावल या.रावेर येथे आज दिनांक २५ रोजी दै.लोकशाही दिवाळी अंकाचे प्रकाशन येथील प्रल्हाद पाटील पतसंस्थेचे कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन करण्यात आले
येथील प्रल्हाद पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दैनिक लोकशाही च्या लोकारोग्य या दिवाळी अंकाचे प्रकाशन चिनावल येथील लोकनियुक्त सरपंच सौ भावना योगेश बोरोले चिनावल प्रा.आ.केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ ठाकूर व प्रल्हाद पाटील पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कृष्ण पाटील चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण निंबा नेमाडे चेअरमन किशोर भिवसन बोरोले , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले , भाजपा जळगाव जिल्हा आत्मनिर्भर भारत योजनेचे सहसयोजक सागर भारंबे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .
सदर वेळी उपस्थितांनी दै.लोकशाही दिवाळी अंक हा सद्यस्थितीवर आधारित लोकारोग्य हा विषय अत्यंत उत्कृष्ट पणे मांडल्याने नक्कीच यांतून प्रेरणा घेत नागरिक आपले आरोग्य सांभाळतील असे मत मांडून दिवाळी अकास शुभेच्छा दिल्या सदर वेळी दै.लोकशाही प्रतिनिधी कार्तिक भारंबे , पतसंस्थेचे किशोर महाजन ,किरण महाजन , विनोद भंगाळे ,भावडू इंगळे ,यांनी परिश्रम घेतले