नगरसेवकाने घेतली दखल; रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही
जळगाव :- शहरातील जुन्या आसोदा रस्त्याची दयनीय अवस्था, या शिर्षकाने दैनिक लोकशाहीत प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल घेत या वॉर्डातील नगरसेवकांनी रस्त्याच्या कामास सुरूवात केली आहे. या रस्त्याची सध्या फारच बिकट अवस्था झाली होती. रस्त्यात खड्ड्ा की खड्ड्यात रस्ता, अशी स्थिती रस्त्याची होती. रस्त्याचे काम काही दिवसातच पूर्ण केले जाईल, अशी माहिती नगरसेवक भरत कोळी यांनी लोकशाहीला दिली.
शहरात अमृत योजनेच्या कामाचा बोजवाराला उडाला असतांनाच आसोदा रस्त्याची दयनीय अवस्था या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेत या रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे.जळगाव शहरातून आसोदा येथील ग्रामस्थांना शहरात येण्या जाण्यासाठी जुन्या आसोद्ा रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून पावसाळा सुरू झाल्यावर गेल्या काही दिवसापासून या रस्त्यावरून प्रवास करतांना बराच त्रास सहन करावा लागला. पावसामुळे या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली होती. चिखलामुळे वाहन फसणे, निसरड्या जागेमुळे वाहन स्लिप होणे, चपलांचे गार्यामुळे जोडे होणे असे प्रकार नागरिक सहन करीत होते. येथील स्थानीक नागरिकांनी दै. लोकशाहीकडे या समस्येची तक्रार केल्यावरून या रस्त्याच्या दयनीय अवस्थेचे वृत्त प्रसिध्द होताच वृत्ताची दखल घेत या वॉर्डातील नगरसेवकाने मक्तेदारांकडून रस्त्याच्या कामाला सुरूवात केली.8 रोजी या रस्त्यावर तीन ते चार डंफर व्दारे डबर टाकण्याचे काम सुरू असून काही दिवसात संपूर्ण रस्त्यावर डबर टाकण्याचे करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक भरत कोळी यांनी दै.लोकशाहीशी बोलतांना दिली.