दैनिक लोकशाहीचे भाकीत ठरले खरे : जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महिलांना प्राधान्य

0

जळगाव :- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जळगाव मतदार संघासाठी विधानरीषदेच्या विद्यमान सदस्या आ. स्मिता वाघ तर रावेरसाठी विद्यमान खा. रक्षा खडसे यांच्या उमेदवारी बाबत दैनिक लोकशाहीचे भाकीत खरे ठरले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उत्सुकता संपून उमेदवार कोण? याबाबत उत्सूकता लागलेली होती. भाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील व आ.उन्मेष पाटील यांची नावे चर्चेत होती. तर रावेरसाठी विद्यमान खा.रक्षा खडसे व आ.हरिभाऊ जावळे यांचे नाव आघाडीवर होते. परंतु जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघासाठी उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा असलेल्या नावांबाबतही दैनिक लोकशाहीने भाकीत वर्तविले होते. यात ”भाजपातर्फे दोन्ही मतदार संघात महिला उमेदवारांना प्राधान्य?” या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. दै.लोकशाहीचे नावाबाबतचे भाकीतही तंतोतंत खरे ठरले असून जळगाव मतदार संघासाठी आ.स्मिता वाघ तर रावेरमधून खा.रक्षा खडसे यांना उमेदवारीची संधी मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.