देशी दारुची अवैधरित्या विक्री करणा-यास मुद्देमालासह अटक

0

भुसावळ :- तालुक्यातील चोरवड रोडवर मोटरसायकलीवरुन देशी दारुची अवैधरित्या विक्री करणा-यास मुद्देमालासह तालुका पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुन्हा अवैधरित्या दारू विक्रेत्यांसह हातभट्टी विक्रेत्यामध्ये खळबळ उडाली आहे.

शनिवार दि २० रोजी तालुक्यातील चोरवड रोडने चोरवड सब स्टेशन समोरील रोडवरुन एक इसम मोटरसायकलने जामनेरकडे  जात होता. यावेळी तालुका पोलिस पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना त्याचा संशय आला व त्यांनी त्यास थांबविले त्याची चौकशी करीत झडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यात टॅगो कंपनीच्या देशी दारूच्या 99 बाटल्या आढळून आल्या. जामनेर येथील किराणा दुकानदार लीलाधर हरी ब-हाटे (वय ४८) असे त्याचे नाव असुन त्यास मुद्देमालासह व एका मोटर सायकलसह ताब्यात घेतले. अंदाजे किंमत ३३ हजार १९८ रु मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध प्रोव्ही का कलम 65(अ) अन्वये तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उप निरिक्षक गजानन करेवाड, पो.हे.कॉ.विठ्ठल फुसे, शिवाजी खंडारे, राहुल महाजन, रियाज काझी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.