देशात 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद ; पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी

0

नवी दिल्ली :देशात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 9 दिवसांत जवळपास 50 हजारहून अधिक रोज नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद केली जात आहे. आज मात्र गेल्या अनेक दिवसांमधील सर्वात धक्कादायक आणि रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे.

देशभरात 24 तासात 62 हजार 538 नवीन कोरोनाग्रतांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंतचा आकडा 20 लाख 27 हजार 074 वर पोहोचला आहे. बुधवारी 56 हजार 282 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनामुळे 24 तासांत 904 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, देशात आतापर्यंत १३ लाखा ७८ हजार १०६ जणांनी करोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत देशात ४१ हजार ५८५ जणांचा बळी गेला आहे.  देशातला रिकव्हरी रेट 67.62% वर पोहोचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील वाढणारी आकडेवारी कमी होण्याचं नाव घेत नाहीय.

Leave A Reply

Your email address will not be published.